। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय तथा सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या मेडीकल टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ रायगडची वार्षिक परिषद महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणार आहे. सन 2021-22ची दोन दिवसीय वार्षिक परीषद 26 व 27 फेब्रुवारी 2022 रोजी हॉटेल भारत येथे संपन्न होणार आहे.
या परिषदेस शनिवार, दि.26 फेब्रुवारी रोजी ठीक स.9.30 वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. या परिषदेत डॉ .शामला कुलकर्णी, प्रो.प्रकाश पांगम यांच्यासह विविध तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परीषदेत माहीती व चर्चासत्रानंतर असोशिएशनची वार्षीक सभा होणार असून, विविध विषयांवर साधक बाधक चर्चा होणार आहे. सर्वसाधारण सभेत जेष्ठ सभासद तथा माजी अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या परिषदेत ज्ञानाबरोबर मनोरंजनाचे आयोजन असल्याने सर्व सभासदांनी मोठ्या संख्येंने उपस्थीत रहावे, अशी विनंती वजा सूचना असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पारखे यांनी केली आहे.