मजगांवमध्ये रंगले जल्लोषमय वार्षिक स्नेहसंमेलन

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषद आदर्श मजगांव मराठी शाळेत चार दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनाने झाली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन हर्षद सुबोध महाडिक व सरपंच पवित्रा चोगले यांच्या हस्ते झाले. चार दिवसीय क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा तसेच खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध गाणी व प्रबोधनपर विनोदी नाटकांचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने रीमिक्स, शेतकरी, पारंपरिक, इंग्रजी कविता व हिंदी मराठी चित्रपटातील नृत्य आदी वैविध्यपूर्ण गाण्यांचा अंतर्भाव केला होता.

यावेळी सुबोध महाडिक, नंदकुमार सोहनी, शैलैश काते तसेच निखील मानाजी, उमेश कोंडाजी, योगेंद्र गोयजी, अमित कोळी, अभिनय कोळी, रूपेश अंबाजी, सरीता धसाडे, पुजा भोईर, मिथुन भोईर आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version