| शिहू | वार्ताहर |
रायगड एज्यूकेशन संचलित नारायण अंबाजी कोकाटे नर्सरी पूर्व प्राथमिक सेमी इंग्लिश विद्यालय तरशेतचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तृप्ती कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका जयश्री कोकाटे यांनी केले.
विद्यार्थांची शैक्षणिक प्रगती पाहता शाळेचे अध्यक्ष हिरामण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपा युवा नेते प्रसाद भोईर, पेण पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोईर, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कदम, अध्यक्ष हिरामण कोकाटे, नारायण कोकाटे, कामगार नेते जनार्धन शेळके, केशव म्हात्रे, दामोदर भोईर, विजय पाटील, भगवान म्हात्रे शिक्षिका अडसूळे मॅडम, प्रज्ञा म्हात्रे यांनसह पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.