जिल्हास्तरीय गडारोहण स्पर्धेत अनुश्री बामुगडे विजेती

| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहे तालुक्यातील किल्ला गावची सुकन्या असणारी व उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या अनुश्री अविनाश बामुगडे हिने रायगड जिल्हा गडारोहण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. किल्ले रायगड येथे ही जिल्हास्तरीय गडारोहण स्पर्धा संपन्न करण्यात आली.या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.तर अनुश्रीने 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात सहभाग होऊन तिने ही कामगिरी करून दाखवली आहे.

सेंट झेव्हियर्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज शिरगाव-महाड येथे शिक्षण घेत असलेल्या अनुश्रीने आपल्या गुणकौशल्याच्या जोरावर विविध स्पर्धेत मोठ्या संख्येने पारितोषिकं प्राप्त केली आहेत. तिच्या या सुयशाबद्दल किल्ला ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडळ तसेच समस्त बामुगडे परिवार व क्रीडाप्रेमी नागरिक यांच्याकडून अभिनंदन व्यक होताना दिसत आहे.

Exit mobile version