आप्त आपटे कुल संमेलन

| अलिबाग | वार्ताहर |

आप्त आपटे सेवाकार्य समितीतर्फे कौशिक गोत्री आपटे कुटुंबीयांचे कुल संमेलन कोकणात देवगड येथे शनिवार 27 व रविवार 28 जानेवारी असे दोन दिवस सशुल्क करण्याचे ठरले आहे. सर्व आपटे मंडळींनी या संमेलनात सहभागी होऊन स्नेहभाव वाढवावा असे आवाहन समितीने केले आहे. संमेलन श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड येथे होणार असून अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आपटे 9920804334 अथवा महेश आपटे 9890619006 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version