| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांची अलिबाग येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अलिबाग सायबर पोलीस ठाण्यात उत्तम कामगिरी बजावणारे अश्वनाथ खेडकर यांनी शुक्रवारपासून रसायनी पोलीस ठाण्याचा प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांनी आपल्या पंचवीस वर्षे पोलिसी सेवेत महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात पोलीस पथकातील साक्षीदार म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांना ओळखले जाते.
पोलीस निरीक्षकपदी अश्वनाथ खेडकर
