| रसायनी | प्रतिनिधी ।
रसायनी गुळसुंदे हद्दीतील लोना कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात कंपनीतील कर्मचार्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांविरोधात शनिवार, (दि.5) आमरण उपोषण पुकारले होते. या उपोषणाला कामगार कुटूंबिय, रसायनी पाताळगंगा परिसरातील स्थानिकांनी पाठींबा दर्शविला होता. उपोषणाच्या चौथ्या दिवशी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि पंचायत समिती सदस्य जगदिश पवार, प्रमोद गोळे, महेश पाटील यांच्या मध्यस्थीने कंपनी प्रशासनासोबत चर्चा होवून उपोषण मिटले.
यावेळी प्रमोद गोळे, महेश पाटील, लाडिवली पोलिस पाटील आदी उपस्थित होते. कामगारांचे आमरण उपोषण मिटण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडकर यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने लाडिवली ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.