| कानपूर | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथील ग्रीनपार्कवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये दोन्ही पहिल्यांदा ओल्या मैदानामुळे टाॅसला आणि सामना सुरु व्हायला विलंब झाला. पूर्व हवामान अंदाजानुसार कानपूर येथे पहिल्या दोन दिवसात पावसाची शक्यता आधीच वर्तवली आहे. आता सामन्यात पावसाचा अडथळा होत आहे.
दरम्यान सुरुवातीला सकाळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. ज्यामधये पहिल्या सत्रात भारताकडून केवळ आकाश दीपला यश मिळाले. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला चेन्नई कसोटीचा नायक रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवत कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद करून बांग्लादेशला मोठा धक्का दिला. नझमुल हुसेन शांतोला बाद करून अश्विनने आशिया खंडात कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा भारतीय विक्रम केला. बांगलादेशसाठी तिसऱ्या बळीसाठी मोमीनुल आणि कर्णधार शांतो यांची भागीदारी धोकादायक वाटत होती. जे की रविचंद्रन अश्विनने तोडली. अश्विनने लंचब्रेकनंतर येताच दुसऱ्याच षटकात एलबीडब्ल्यू केले. शांतोने 57 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली.
अश्विनने बांग्लादेशच्या कर्णधाराला बाद करताच तो आशिया खंडात भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने अनिल कुंबळेचा 82 सामन्यांच्या 144 डावात 419 बळींचा विक्रम मोडला. अश्विनने 97 सामन्यांच्या 171व्या डावात 420 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये अश्विनने 33 डावात पाच बळी घेतले आहेत. आशियातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर रविचंद्रन अश्विन आता फक्त श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे.