| महाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ टोइंग व्हॅनने जीपला धडक दिली होती. या अपघातातील महाडमधील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे. वीर स्थानकाजवळ झालेल्या अपघातात महाड तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मयत व्यक्तीच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत केली जाणार आहे.