| रसायनी | वार्ताहर |
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून दि.2 ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कार्यक्रम आयोजित करून पोलीस स्थापना सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील पिल्लई एचओसी ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज रसायनी येथील विद्यार्थ्यांना शनिवार, दि.4 रोजी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी पोलीस प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती दिली. यात पोलीस ठाण्यातील कामकाजासह रोड सेफ्टी, सायबर क्राईमबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी जवळपास 150 विद्यार्थ्यांनी पोलीस कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी रसायनी पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस राहूल भडाले, शिक्षकवर्गासह विद्यार्थी उपस्थित होते.