सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत अलिबागच्या खेळाडूंचा डंका

रेवदंडा । वार्ताहर ।

शालेय राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धा ठाणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड जिल्हा तसेच मुंबई विभाचे नैत्रुत्व करत 11 अलिबागच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण पदक, एक रौप्य पदक व पाच कांस्य पदक अशी नैत्रदीप कामगिरी केली. आयईएस माध्यमिक शाळा वरसोली येथील शिकत असलेली अवनी राजेंद्र कवळे 1 सुवर्ण पदक, जेएसएममध्ये शिकत असलेला सिध्दार्थ अशोक पाटील सुवर्ण पदक, वरद संदिप वर्तक रौप्य पदक, नम्रता गणेश चव्हाण कांस्य पदक, नमिता नाईक कांस्य पदक, सानिया जालिंदर कांस्य पदक, शुभ रामचंद्र सारंग कांस्य पदक, भार्गवी प्रकाश नाईक कांस्य पदक, ऋषी नरेंद्र गावडे, संचिता नारायण थिटे, पार्थ संजय म्हात्रे या सर्व खेळाडुंना विजय तांबडकर प्रियंका संदेश गुजांळ, सिद्धेश सतविडकर, शुभम महेंद्र नखाते, वेदांत संदेश सुर्वे, माही खमिस, विराज साखरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Exit mobile version