अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार अतुल झेंडे यांनी स्वीकारला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य शासनाचे बदलीने पदस्थापन करण्याचे आदेश झाल्याने त्यानुसार नवनियुक्त अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांचेकडून रायगड जिल्हा अपर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यापूर्वी सोलापूर ग्रामीण, बुलढाणा, रायगड, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. रायगड जिल्हा अपर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नुकताच उत्कृष्ट कामगिरीकरीता रायगड जिल्हा पोलीस दलास राज्यातील बेस्ट पोलीस युनिट अवार्ड मिळालेला असून यापुढे देखील अशीच उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचे सांगून समाजातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून काम करण्याचा प्रयत्न करणार असले बाबत त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version