| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून थकीत कर असलेल्या वाहंनाचा लिलाव 10 जानेवारीला सकाळी 11 वाजता नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चाचणी मैदान येथे होणार आहे.
मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांअतर्गत जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या या वाहनांच्या मालकांना थकीत कर भरण्यासाठी आरटीओकडून कळवण्यात आलेले आहे. तरी देखील त्यांनी कर भरलेला नाही. अशा बस, स्कूल व्हॅन वाहनांचा ई ऑक्शन पद्धतीने जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत थकबाकीदारांना कर भरण्याची संधी दिली आहे. तरी इच्छुकांनी लिलावामध्ये भाग घ्यावा. या संदर्भातील अटी लिलावापूर्वी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येईल, असे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी स्पष्ट केले.