। दुबई । वृत्तसंस्था ।
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. हा हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आलेले आहेत. दोन्ही संघांनी गट फेरीत खूप चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने त्यांचे तिन्ही सामने जिंकले होते. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाने 2 सामने जिंकले होते आणि 1 सामना पावसामुळे वाया गेला होता. या दोन्ही संघांचे लक्ष त्यांच्या तिसऱ्या विजेतेपदावर आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2-2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलीयाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित सेना कांगारूंना किती धावांवर रोखणार, याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे. तसेच, भारतीय संघाने मागील बदला घेण्यासाठी कंबर कसल्याचे निदर्शनात येत आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलियन संघ
कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, तनवीर संघा.