पंडित पाटील यांच्या हस्ते सत्कार; चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | वार्ताहर |
पेझारी येथील पंतभक्त मंडळाचे अध्यक्ष गुरुबंधू दिगंबर राणे यांचा धोकवडे, ता. अलिबाग येथे पंत पाडव्याच्या निमित्ताने माजी आमदार पंडित पाटील व रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
ठाणे येथील गुरुवर्य दिगंबर पंत रवळेकर प्रतिष्ठान यांच्यामार्फत त्यांच्या श्रीदत्त संप्रदाय संतश्रेष्ठ सद्गुरू श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या अवधूत भक्तास गुरुवर्य दिगंबर पंत रवळेकर स्मृतीप्रीत्यर्थ अवधूत गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्यानुसार यावर्षी पेझारी येथील पंतभक्त मंडळाचे अध्यक्ष गुरुबंधू दिगंबर सुभाषराव राणे यांना दि.15 ऑगस्ट रोजी ठाणे येथील कच्छी-कडवा पाटेदार हॉलमध्ये श्री पंत घराण्यातील प.पु. संजीवपंत बाळेकुंद्री व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयेशपंत रवळेकर यांच्या हस्ते त्यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गुरुबंधू-भगिनी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यानिमित्ताने दि.17 ऑगस्ट रोजी धोकवडे येथे श्रीपंत भक्त मंडळामार्फत पंत पाडव्याचे औचित्य साधून दिगंबर राणे यांना त्यांच्या अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी आ. पंडित पाटील व रायगड जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन गुरुबंधू दिगंबर राणे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.