अलिबाग लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अविनाश राऊळ

डायमंडच्या अध्यक्ष जान्हवी आगाशे, लिओ अध्यक्ष वरुण मोघे
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लायन्स क्लब ऑफ अलिबागची सन 2022-23 मधील नवीन कार्यकारिणी अलिबाग वरसोली येथील ‘हॉरिझॉन’च्या सभागृहात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत नियुक्त करण्यात आली.

इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन सेरिमनीच्या या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ अलिबागचे नवीन अध्यक्ष लायन अविनाश राऊळ, सचिव लायन रोहन पाटील, खजिनदार लायन चंद्रहार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ डायमंडच्या अध्यक्ष जान्हवी आगाशे, सचिव शिल्पा कवळे, खजिनदार अपर्णा पाटील, तर लिओ क्लब ऑफ अलिबागचे नवे अध्यक्ष म्हणून वरुण मोघे, सचिव स्वराज दातार, खजिनदार अजिंक्य अधिकारी या सर्वांना पदाची शपथ देऊन नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमात नवीन लायन मेंबर्सनाही शपथ देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये प्रमुख पाहुणे आणि इन्स्टॉलेशन ऑफिसर लायन डॉ. हेमंत दुगड, इंडक्शन ऑफिसर लायन संजीव सूर्यवंशी, रिजन डव्हायजर लायन अनिल जाधव, रिजन कोऑर्डिनेटर लायन प्रदीप सिनकर, रिजन चेअरमन लायन महेश मोघे, झोन चेअरमन अ‍ॅड. अंकित बंगेरा, निकेत शाह, आनंद देशमाने, मावळते अध्यक्ष भगवान मालपाणी, प्रितम गांधी, सुयश पाटील तसेच लायन सर्वश्री अनिल म्हात्रे, नयन कवळे, प्रदीप नाईक, प्रवीण सरनाईक, प्रिया पाटील, संजय पाटील, रमेश धनावडे, डॉ चंद्रकांत वाजे, डॉ महेंद्र घाटे, संतोष पाटील, महेंद्र पाटील, अतुल वर्तक, रणजित जैन, अनिल आगाशे, परेश भतेजा आणि लायन्स परिवारातील दोनशेहून अधिक सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रगीताने प्रारंभ झालेल्या रंगतदार सोहळ्यात अंजली जोशी यांच्या ‘मोगरा फुलला’ या गीताने वातावरण प्रफुल्लित झाले. सूत्रसंचालन डॉ. रेखा म्हात्रे यांच्यासह शिल्पा कवळे यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

Exit mobile version