| खांब | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे समस्या परिहार स्पर्धा भाटे वाचनालय येथे यशस्वीरित्या पार पडली. ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे आणि के.पी.आय.टी.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून विज्ञान, विज्ञानातून उपाय या छोटे सायंटिस्टस् प्रकल्पांतर्गत ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 19 शाळांमधील आठवी व नववी इयत्तेतील एकूण 153 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन डाएट प्रतिनिधी मानसी कदम, अंशुल कंपनीचे मॅनेजर किशोर तावडे, जेष्ठ शिक्षिका मुग्धा ओक, ज्ञान प्रबोधिनी, पुणेचे प्रकल्प प्रमुख ओंकार बाणाईत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेदरम्यान गट शिक्षणाधिकारी मा. मेघना धायगुडे यांनी भेट देऊन पहाणी केली. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक गटासोबत संवाद साधला. विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, रोहाचे सदस्य प्रसाद दगडे आणि प्रसाद भोईर यांनीही भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानेगुरुजी विद्यानिकेतन सानेगाव येथील शिक्षक विजय चौधरी यांनी केले. ज्ञान प्रबोधिनी, शैक्षणिक उपक्रम संशोधिका, प्रकल्प प्रमुख पूर्वा धोकटे, ओंकार बाणाईत आणि अंजली कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचा खूप आनंद घेतला. तर या स्पर्धेचे संयोजन तेजल नवशे, स्वप्नाली आकलेकर यांनी केले.
समस्या परिहार स्पर्धा उत्साहात
