देवयानी मोरे यांना अविष्कार फाऊंडेशनतर्फे पुरस्कार जाहीर

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका पत्रकार संघाच्या सचिव देवयानी समीर मोरे यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.25) सकाळी 11 वाजता श्रीवर्धन तालुक्यातील कुलकर्णी भाई बिरादर हॉलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

पत्रकारितेबरोबरच समाजातील अनाथ मुलांना तसेच गरिबांना मदतीचा हात पुढे करण्याकरीत त्या पुढे असतात. त्यांच्या पत्रकारितेची तसेच सामाजिक कार्याची दखल अविष्कार या सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी फाऊंडेशनने घेऊन त्यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Exit mobile version