बाल कामगार प्रथेविरोधात पनवेलमध्ये जनजागृती अभियान

। पनवेल । वार्ताहर ।
कामगार उपायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून रविवारी पनवेलमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी कामगार उपायुक्त रायगडचे प्रदीप पवार, सहाय्यक कामगार उपायुक्त समीर चव्हाण, सखी मंच आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिन ओव्हाळ, ममता मंचच्या स्मिता काळे यांच्यासह अनेक मान्यवर आजच्या जनजागृती अभियानामध्ये सहभागी झाले होते. यावेळी बालमजुरी थांबवू या आणि उज्वल भारत घडवूया याबाबतचे फलक सुद्धा हाती घेऊन जनजागृती करण्यात आली.

आजच्या जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या औचित्याने जनजागृती करत असतो बालकामगारांना उज्वल भविष्यासाठी त्यांना काम न देता त्यांना शिक्षण द्यावे व देशाचे भविष्य उज्वल करावे व या अभियाना मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.

– प्रदीप पवार, रायगड कामगार उपायुक्त
Exit mobile version