। अलिबाग । प्रतिनिधी ।
तालुकास्तरिय कुस्ती स्पर्धा नुकतीच चोंढी येथील स. म. वडके विद्यालयाच्या मैदानात शुक्रवारी पार पडली. या स्पर्धेत आवास येथील बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक खेळ करून घवघवीत यश संपादन केले.
वेगवेगळ्या वजनी गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. 14 वयोगटातील मुलांच्या गटात पवन मांझी, मयूर कोकळे, केतन केंडे, आश्लेष पाटील, आर्यन लोभी, तनिष पाटील, श्रवण भगत तसेच 17 वर्षे वयोगटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात अक्षय वरक, गजानन काकळे, नाविन्य वर्तक, अंश नाखवा, संस्कार भगत, ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात ऋत्विक शिळदणकर, वरद सांगले, दुर्वेश पाटील, अधिराज व्हडगीर, संकल्प भगत तर, 19 वर्षे वयोगटातील फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात स्वप्नी हंबीर, ओम धोंडसेकर, ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात अमृत हंबीर, प्रमोद वरक यांनी चांगली कामगारी बजावली. 14 वर्षे वयोगटातील (मुली ) मीरा पाटील, समीक्षा पाटील, मनिषा थापा, लक्ष्मी थापा यांनी तर, 17 वर्षे वयोगटातील सृष्टी मढवी यांनी खेळ दाखवत यश संपादन केले. यामध्ये प्रथम व द्वीतीय क्रमांक विद्यार्थ्यांनी मिळवून शाळेचे नाव लौकीक वाढला. प्रथम क्रमांक संपादन करणार्या 17 हून अधिक विद्यार्थ्यांची खोपोली येथे होणार्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.