उरणच्या अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था

। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणार्‍या दास्तान फाटा ते चिरले जासई ते गव्हाण मार्गावर अवजड वाहतूकीमुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे हे मार्ग धोकादायक बनले आहेत. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने आयात निर्यातीसाठी तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीत गोदामे, एमटीयाड यांचे जाळे पसरले आहे. यात बहुतांशी गोदामे हि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याला लागून बसविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा दर्जा हा कमी असल्याने, अवजड वाहतुकीसाठी हे मार्ग उपयुक्त ठरत नाहीत. त्यामुळे गोदामात मालाचीने आण करण्यासाठी येणार्‍या अवजड कंटेनर टेलर यांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Exit mobile version