मंगेश शिंदे व सुनिल जाधव प्रथम
। अलिबाग । वार्ताहर ।
क्रीडा भुवन अलिबाग येथे दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी बॅडमिंटन पुुरुष दुहेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा खुला गट व प्रौढ गट (चाळीस वर्षांवरील पुरुष) अशा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रौढ गटात झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत मंगेश शिंदे व सुनिल जाधव विजेते तर नितीन जैन व विक्रम ओसवाल उपविजेते ठरले. त्याचप्रमाणे तिकडे खुल्या प्रवर्गात गणेश सपकाळ व तेजस खोमणे यांनी जेतेपद पटकावले तर उमेश व अथर्व उपविजितेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्यांना एकूण 25 हजार रुपयांचे रोख बक्षीस व चषक देण्यात आले. उदय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी नगरसेविका सौ. ठोसर तसेच श्री. प्रभू व श्रीकांत ओसवाल यांचे अर्थसहाय्य लाभले तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नितीन जैन, हेमंत हजारे, अशोक साष्ठे, जुनेद घट्टे यांच्या विशेष परिश्रमासह संपूर्ण क्रीडा भुवन क्लबने मोलाचे सहकार्य केले.
क्रीडा भूवन अलिबाग आयोजित बॅडमिंटन स्पर्धा
