। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक दशके झंझावात निर्माण करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विविध क्षेत्रांतून मानवंदना दिली जात आहे. अशात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भाष्य केले आहे. बाळासाहेब कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत, गव्हनर्र झाले नाहीत किंवा केद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदे त्यांनी आपल्या सहकार्यांना आणि सामन्य शिवसैनिकांना दिली आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. मात्र, बाळासाहेंबांनी स्वत:चे विश्व उभे केले. त्यामध्ये मराठी माणासाला स्वाभिमानाने जगण्यासाठी केलेले संघर्ष आहे. बाळासाहेबांनी गर्वानी हिंदू म्हणून जगण्याचा मंत्र दिला. त्यातून हा देश आणि महाराष्ट्र घडत राहिला. त्यातून दोन पिढ्या तयार झाल्या आहेत, असे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या महाराष्ट्राला स्वाभिमाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. आजही पिढ्या बदलल्या मात्र येणारी प्रत्येक मराठी पिढी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ऋण मान्य करत त्यांचा विचार इतरांना देऊन, पुढच्या पिढीकडे जाते, असेही ते म्हणाले.