| नांदगाव | वार्ताहर |
नूतन स्कूल ऑफ नर्सिंग मधील विद्यार्थ्यांनी, नूतन मेडीकल ॲंड रीसर्च फौंडेशन बोर्ली-तळवली ता.मुरुड-जंजिरा येथे नूतन स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमार्फत राष्ट्रीय बांबू मिशन, बांबू वृक्षाची टीशू कल्चर रोपे लागवड योजने अंतर्गत विशेष बांबू लागवड कार्यक्रम स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आला. या वेळी डॉ.नूतन रामलिंग माळी अध्यक्षा-राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था आणि डॉ. रामलिंग माळी सचिव-राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्था यावेळी उपस्थित होते. बांबू वृक्ष लागवड कार्यक्रमास सुरुवात करण्या आधी मा. डॉ. रामलिंग माळी यांनी बांबू वृक्षापासून पर्यावरणास होणारे फायदे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी प्रा.श्री. गुरुपाद नापीक-नूतन स्कूल ऑफ नर्सिंग व इतर शिक्षक, वृंद, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.