| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभेचे माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. त्यांच्यावर मुद्दलाच्या रकमेवर व्याज वाढले असून, त्यांना बँकेच्यावतीने 101 ची नोटीस बजावण्यात आली आहे.
सुरेश लाड तीन यांनी स्वतः आणि पत्नी आणि पुतणे यांच्या नावावर रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतले होते. व्याजासह ती रक्कम 6 कोटी 72 हजार 817 रुपये झाली असून, हे पैसे थकबाकी असल्याने त्यांना बँकेमार्फत सहाय्यक निबंध कार्यालयाकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 प्रमाणे वसुलीची नोटीस काढण्यात आली आहे. दरम्यान, माझे कर्ज थकीत असल्याने मला नोटीस आली आहे हे मान्य आहे. मात्र, बँकेला आणि सहाय्यक निबंध कार्यालयाला माझ्याकडे पैसे आल्यावर मी कर्जाची रक्कम भरेन असे कळविले असल्याचे सुरेश लाड यांनी सांगितले.