बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ते पैसे काढण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यासह इतर परिसरातील बँकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.

जास्तीत जास्त या योजनेचा पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जुलै व ऑगस्ट या महिन्यांचा सन्मान निधी रुपये तीन हजार महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे सकाळपासून महिलांची पैसे काढण्यासाठी चांगलीच गर्दी झाल्याने बँक कर्मचारीदेखील भांबावून गेले आहेत.

Exit mobile version