सानिका इंडस्ट्रीज मंडळ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
| महाड | प्रतिनिधी |
उत्पादक संघटना सांस्कृतिक समिती व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसी येथील एमएमएसीईटीपी सभागृहात महाड औद्योगिक क्षेत्र कारखाना मर्यादित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये एकूण 22 कारखान्यातील भजनी मंडळांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 11,000 द्वितीयासाठी 7,000 व तृतीयसाठी रुपये 5000 व सन्मानचिन्ह तसेच वैयक्तिक आकर्षक बक्षिसे अशी बक्षिसांची रचना होती.स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त नितीन पाटील, एम.एम.ए. अध्यक्ष संभाजी पठारे, सीईटीपी अध्यक्ष अशोक तलाठी, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते.
सहभागी 22 पैकी 6 अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.अटीतटीच्या रंगलेल्या या अंतिम फेरीत सानिका इंडस्ट्रीजने प्रथम,कोप्रान लिमिटेडने द्वितीय, ड्युफ्लोन इंडस्ट्रीजने तृतीय क्रमांक पटकावला तर एम्बायो लिमिटेडला उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले. सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच सर्व सहभागी मंडळांना देखील प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.रायगड भूषण पुरस्कार प्राप्त मृदुंग विशारद सुनील मेस्त्री, भजनसम्राट सिताराम साळुंखे, शास्त्रीय गायक राहुल सुतार, मृदुंगमणी पार्थ म्हस्के यांनी या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण केले.
ङ्गङ्घयावर्षी प्रथमच औद्योगिक क्षेत्र परिसरात या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या स्तरावर हे आयोजन केले जाईलङ्घङ्घ असे एमएमए अध्यक्ष संभाजी पठारे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एमएमए तर्फे निखिल भोसले,बिपिन वडगावकर,मनोज वगरे,सागर जाधव यांसह सर्व सहकाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले.