। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
मागच्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या निवडणूक चिन्हावरील वादावर अखेर आज पडदा पडला आहे. काल उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं असून, ‘मशाल‘ हे चिन्ह मिळालं आहे. त्यानंतर शिंदे गटाला कुठलं चिन्ह मिळणार याबाबत जोरदार चर्चा होती. तर शिंदे गटाला अखेर चिन्ह मिळालं आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं असून, निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ‘ढाल-तलवार‘ हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे.