। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलची निश्चित माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतीतील कुर्ला परिसरामध्ये एका इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यातील एका खोलीला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आगीच्या या घनटेनंतर इमारत रिकामी केली जात आहे. अद्याप काही रहवासी या इमारतीत अडकल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागलेली असावी, असे सांगितले जात आहे.