| उरण | वार्ताहर |
नेरुळ, सिवूड्स येथे राहणार्या डॉक्टर दांपत्याला तब्बल 3 कोटी 30 लाखांचा उरणमधील जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी या बंटी-बबलीच्या जोडीने गंडा घातल्याची घटना घडली होती. याबाबत नवी मुंबई, एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर परदेशात पलायनाच्या प्रयत्नात असताना, या बंटी बबलीच्या जोडीला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानातळावरून अटक करण्यात आली आहे.
मुलांना परदेशात शिक्षण आणि डॉक्टर दांपत्याला नोकरी देतो असे सांगून, ‘लिव्ही ओव्हरसीज स्टडीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक जुगनू कोळी आणि तेजस्वी कोळी यांनी कोट्यावधी रुपये उकळले असल्याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यातील आरोपी बंटी, बबलीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात दाद मागीतली होती.
मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटालला होता. यामुळे न्यायलायीन प्रक्रियेला सामोरे जात कारवाईला सामोरे जावे लागू नये म्हणून, परदेशात जाण्याचा प्रयत्न केला असता, या जोडीला दिल्ली विमानतळावर अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायाल्याने या प्रकारनंतर तेजस्वी कोळी हिला न्यायालयीन कोठडी दिली असून, जुगनू कोळी याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये डॉक्टर दांपत्याच्या दोनही मुलांचे दोन शैक्षणिक वर्षांचे नुकसान झाले आहे. याबाबत नवीमुंबई एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.