| नेरळ | प्रतिनिधी |
नांगुर्लेजवळ गुजरातच्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालक गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. स्वामी समर्थ पळसदरी दर्शनानंतर परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या गाडीने पेट घेतला तरी स्वामीच्या दर्शनाने त्या सर्वांचे प्राण वाचले आहे.
गुजरातहून पनवेल येथे प्रॉपर्टीच्या कामासाठी आलेल्या हर्षद प्रजापती यांच्या गाडीला कर्जत- खोपोली रस्त्याने प्रवास करीत असताना नांगुर्ले जवळ प्रजापती हे आपल्या कारने मुंबईत आले होते. व्यावसायिक प्रजापती यांनी गुजरातमधून पनवेलमध्ये प्रॉपर्टी कामासाठी आले असता प्रवास करताना पळसदरी येथे थांबून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर परतीच्या वाटेवर, खोपोली-कर्जत मार्गावरील नांगुर्ले परिसरात त्यांनी गाडी थांबवून मोबाईलवर संभाषण सुरू केले होते. त्याचवेळी गाडीने अचानक पेट घेतला.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, काही क्षणांतच गाडीने पेट घेतल्याने वाहन पूर्णतः जळून खाक झाले. मात्र प्रसंगावधान राखत चालकाने वेळीच गाडी सोडल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस आणि कर्जत नगरपरिषदेचे फायर ब्रिगेडचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या ठिकाणी रस्ता मोकळा असल्याने वाहतूक कोंडीही झाली नाही. या घटनेमुळे क्षणभर परिसरात खळबळ निर्माण झाली होती, मात्र पोलिस व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. हर्षद प्रजापती हे गुजरातहून पनवेल येथे एका प्रॉपर्टी प्रकल्पासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी आध्यात्मिक स्थळ म्हणून पळसदरीतील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले होते आणि स्वामीच त्यांच्या पाठीशी धावून आल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.