| तळा | वार्ताहर |
तळा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.4) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. किसन चौधरी (40) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून तळा बाजारपेठेत त्याचे ज्वेलर्स व नोव्हेल्टी चे दुकान आहे. शनिवारी किसन चौधरी हे आपल्या कामगारासोबत शेणवली येथील फार्महाऊस वर गेले होते. त्यांनी कामगाराला मी थोडा वेळ आराम करून येतो असे सांगून माघारी पाठवले. बऱ्याच वेळापासून मालक आले नाहीत, म्हणून पुन्हा कामगार शेणवली येथे पाहायला गेला असता त्याला मालक लोखंडी पाईपाला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गवई यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तसेच पुढील कारवाईसाठी मृत व्यक्तीला उपजिल्हारुग्णालय माणगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. किसन चौधरी यांच्या आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. या घटनेची तळा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.मिलिंद खिरीट हे करीत आहेत.