कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गुणवंतांचा सन्मान
। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्व. आमदार मधुकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट-अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ-रायगड अॅड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवारी सायंकाळी सातिर्जे येथे पार पडला. जिल्ह्यातील 70 हून अधिक गुणवंताचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दैनिक कृषीवलचे वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार यांनादेखील हा राज्यस्तरीय पुरस्कार आ. भाई जगताप व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरव करण्यात आला.
अॅड. उमेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षापासून पुरस्काराची ही परंपरा जपली आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी बजावणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचा कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. ही परंपरा त्यांनी आजही जपून जिल्हयातील गुणवंताना प्रोत्साहन देण्याचे काम केले. उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शुक्रवारी सायंकाळी सातिर्जे येथे कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. दैनिक कृषीवलचे वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार यांना पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील दहा कर्तबगार व्यक्तींचा विशेष सन्मान या सोहळ्याप्रसंगी करण्यात आला.