शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग । प्रतिनिधी ।
श्री बाळ गणेश क्रिकेट मंडळ राजपूरी कोळीवाडी आयोजित विष्णूदेवा क्रिकेट संघ राजपूरी तर्फ तीन दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजपूरी कोळीवाडा मर्यादित क्रिकेट सामने 11 ते 13 जानेवारी या कालावधीत होणार असून शनिवारी 11 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, महादेव कोळी समाज राजपूरी अध्यक्ष रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
श्री बाळ गणेश प्रिमिअर लिग 2025 ही क्रिकेट स्पर्धा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. 13 जानेवारीला अंतिम सामना झाल्यावर विजेत्या संघाला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ मुंबईचे चेअरमन विजय गिदी, महादेव कोळी समाज राजपूरी उपाध्यक्ष घनश्याम घागरी, राजपूरी ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया गिदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे. तीन दिवस होणार्या क्रिकेट स्पर्धेच्या वेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबागचे माजी नगरसेवक तथा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य वामन चुनेकर, रायगड जिल्हा मच्छीमार संघ अलिबागचे उपाध्यक्ष मनोहर बैले, मूरूड पंचायत समितीच्या माजी सभापती निता गिदी, तुकाराम पाटील, किशोर चवरकर, चंद्रकांत कमाने, लियाकत कासकर, हिरकणी गिदी आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून स्पर्धेला व खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत.