चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील आई काळकाई क्रिकेट क्लब वावेखार आयोजित जय शिवराय असोसिएशनतर्फे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.05) सकाळी वावेखार येथे मैदानात ही स्पर्धा सुरु होणार आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश मढवी, अलिबाग मजूर फेडरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर, वावेखार-वावेपोटगेचे माजी सरपंच राम गिजे, संतोष घाणेकर, जगदीश घाणेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक मिळविणार्या संघाला 15 हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांकाला दहा हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला सात हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज व मालिकावीर यांना चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत पंचाचा निर्णय अंतिम राहिल. सामन्यात फेरबदल करण्याचा निर्णय कमिटीकडे राहिल अशा नियम अटी लागू करण्यात आल्या आहेत.