इच्छुक सेवानिवृत्तासाठी आवाहन

| अलिबाग | वार्ताहर |
जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे व इतर अनुषंगिक कामकाजासाठी भूमी अभिलेख विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा आवश्यक आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागातील इच्छुक असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचार्‍यांनी आपले अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग-402201 येथे सादर करावेत. या योजनेंतर्गत काम करण्यास इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू नसावी, तसेच त्यांचे वय 65 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.

संबंधिताच्या सेवा शासनाकडील वेळोवेळी पारित केलेल्या प्रचलित शासन निर्णय/अटी शर्तीची पूर्तता केल्यानंतर घेण्यात येतील व ही प्रक्रिया कधीही, कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना असेल, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी कळविले आहे.

Exit mobile version