| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव, वैजाली व खंडाळे ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यपदांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने प्रचाराला सुुरूवात करण्यात आली आहे. खंडाळच्या सदस्यपदाच्या उमेदवार समिक्षा सागर गुरव यांच्या प्रचाराला बुधवारी (दि.22) सायंकाळी तळवली येथील मारुती मंदिर नाका येथून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली.
यावेळी रायगड बाजाराचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, माजी सरपंच संतोष गुरव, नरेश गोंधळी, विलास वालेकर, सुधीर पाटील, अनिल माळी, अनिल पाटील, उदय वेळे, संदेश पाटील, दिलीप वेळे, राजेंद्र पाटील, सुनील नाईक, सुप्रिया नाईक, सविता वेळे, कविता वेळे, नमिता वेळे, मनोहर पाटील, सागर गुरव, रेश्मा नाईक, साधना पाटील, मयुरी घरत, तृप्ती घरत, सुधीर कवळे, गिता थळे, रुपेश वेळे आदींसह ग्रामस्थ, शेकाप कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खंडाळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग 4 मधील पोट निवडणूकमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार समीक्षा सागर गुरव यांच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. या प्रचाराला कार्यकर्त्यांसह मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील वैजाली ग्रामपंचायतीच्या एक सदस्यपदासाठी दोन, नागावच्या एक सदस्यपदासाठी दोन आणि खंडाळेच्या एक सदस्यपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वैजाली, खंडाळे व नागाव या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यपदाच्या जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. दि.28 एप्रिलमध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मतमोजणी दुसऱ्या दिवशी दि.29 एप्रिलला होणार आहे. नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या उमेदवार मंजुषा राणे, वैजाली ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार नंदकुमार प्रभाकर पाटील, खंडाळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार समिक्षा सागर गुरव हे शेकापचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.






