। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल दि. 14ः भारत विकास परिषद, पनवेल शाखा आणि फडके विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इ. 8 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
करियर शोध- यशाची? (समाधानाची) गुरुकिल्ली या शीर्षकाखाली हा कार्यक्रम वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या सभागृहामधे हा कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. ओंकार माटे आणि अर्चना समर्थ यांनी विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष सुबोध भिडे, खजिनदार शेखर बर्वे, महिला संयोजक डॉ. कीर्ती समुद्र, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन, इंग्रजी माध्यामाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीतल साळुंखे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ओंकार माटे यानी चित्रफितीच्या माध्यमातून मुलांची जडणघडण होताना तसेच करियर निवडताना येणार्या समस्या विशद केल्या. अर्चना समर्थ यानी मार्गदर्शन करताना विज्ञान, वाणिज्य, कला आदी शाखांमधून उपलब्ध असलेल्या संधीबाबत विवेचन केले. पण करियर निवडताना नैसर्गिक क्षमता, कौशल्य, स्वाभाविक कल, आवड, व्यक्तिमत्व, भावनिकता, कामाचे मूल्य, बुद्धिमत्ता या गोष्टिंचा विचार करून करून करियर निवडण्याचे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना या दोघानी उत्तरे दिली.
रचना पाटील यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. कीर्ती समुद्र आणि शुभांगी भिडे यानी संपूर्ण वन्देमातरम् चे गायन केले. अध्यक्ष सुबोध भिडे यानी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. मकरंद तडवलकर यानी भारत विकास परिषदेच्या कार्याची माहिती दिली. गार्गी कुलकर्णी यानी वक्त्यांचा परिचय करून दिला. श्रेयस भिडे यांनी तांत्रिक सहाय्य केले. सुवर्णा तोंडूलकर यानी कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन केले. भारत विकास परिषदेचे सभासद आणि फडके विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.
पनवेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
