| पनवेल | वार्ताहर |
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे नुकतेच आयरिस नेत्र रुग्णालय आणि एस. पी. मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स यांच्या सहकार्याने नवीन पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात मराठी आणि इंग्रजी माध्यमातील प्री प्रायमरीपासून उच्च माध्यमिक वर्गातील सुमारे 1800 विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ. मानसी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने नेत्रतपासणी, रंग आंधळेपणा तपासणीसुद्धा करण्यात आली.
दोन दिवस चाललेल्या या शिबिराला प्रांतपाल एन.आर. परमेश्वरन, जीएसटी चेअरमन विजय गणात्रा, रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, झोन चेअरमन अल्केश शहा, एक्झिक्युटिव्ह डी.कॅब. सेक्रेटरी संजय गोडसे यांनी भेट दिली.
ज्या मुलांना डोळ्याच्या समस्या जाणवल्या त्यांना डॉ. मानसी मोरे यांनी मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित, स्वाती गोडसे, संध्या महानुभाव, आदित्य दोशी, मिलिंद जोशी, जयेश मणियार, एस.पी. मोरे कॉलेजचे सतीश मोरे तसेच, फडके विद्यालयाच्या शिक्षक आणि कर्मचार्यांनी मेहनत घेतली.