| पनवेल | वार्ताहर |
गटविकास अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन एक तास अडवून ठेवल्याप्रकरणी 16 जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 जुलै रोजी चिखले ग्रामपंचायतच्या सरपंच दिपाली तांडेल, त्यांचे पती दत्तात्रय तांडेल हे स्वतःच्या घरात कोंडून घेऊन औषध पिऊन देहत्याग करणार होते. त्यानुसार त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी आणि त्यांना परावृत्त करण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल हे शासकीय वाहनाने चिखले गावात गेले होते. यावेळी दिपाली तांडेल आणि दत्तात्रय तांडेल यांनी विषारी औषध प्यायल्याने पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पाठवून दिले. त्यानंतर ग्रामसेवक हे चिखले गावातून परत पनवेल येथे गटविकास अधिकारी व इतर यांच्यासह शासकीय बोलेरोतून जात असताना काही ग्रामस्थांनी त्यांचे शसकीय वाहन रस्त्यात अडवले आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी केली. त्यावेळी शासकीय वाहन एक तास अडवून ठेवले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिकाऱ्यांची गाडी अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606