डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

| पनवेल | वार्ताहर |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था, नावडे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फूले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरणात नावडे कॉलनीमध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर मुलांच्या व स्रियांच्या विविध स्पर्धा तसेच मुला-मुलींची विविध नृत्य व नाट्यीकरण सादर करण्यात आले. डॉ. अपर्णा गायकवाड यांनी उत्कृष्ट पणे सूत्र संचालन केले.

या प्रसंगी विलास गायकवाड, भिमराव कांबळे, सुदेश शिंदे, प्रमोद गजहंस, गोरख अहिरे, धर्मेंद्र अहिरे, राजाराम कांबळे, संजय गायकवाड, अ‍ॅड. सविता गायकवाड, डॉ. अपर्णा गायकवाड उपस्थित होते. विलास गायकवाड यांनी आभार मानले.

Exit mobile version