| पनवेल | वार्ताहर |
सिमेंट मिक्सरने स्कूटरला दिलेल्या धडकेत संगीता कडू या महिलेचा मृत्यू झाला. तिचे पती धनाजी कडू हे जखमी झाल्याची घटना कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या अपघाताप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याज आला आहे. सुकापूर येथे राहणारे धनाजी हे त्यांची पत्नी संगीता हिच्यासोबत त्यांच्या टीव्हीएस स्कूटरने नातेवाईकाच्या साखरपुड्याला छाया रिसॉर्ट, मानघर येथे गेले होते. मानघर येथून रात्रीच्या वेळेस घरी परत येत असताना उरण रोडवर सिमेंट मिक्सर चालकाने कडू यांच्या स्कूटरला धडक दिल्याने हा अपघात झाला.