| पुणे | प्रतिनिधी |
गेल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारल्यानंतर पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे 05 ते 1.5 मीमी पाऊस असणार आहे. तसेच, कोकण भागात जेसे की सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे. 01 मिलिमीटर तर काही दिवशी 15 मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे.
मराठवाडा विभागात जसे की धरावी, धाराशिव, हिंगवली बीड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अल्पशा पावसाचं प्रमाण राहणार आहे. 2 मिलिमीटर ते 4 मिलिमीटर पाऊस राहणार आहे. इतर सर्व जिल्ह्यात 0.1 ते 1.3 मिलिमीटर पर्यंत पाऊस राहणार आहे.