| कल्याण | प्रतिनिधी |
कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य काही लहान मुलं जखमी झाली आहेत. कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल स्कूलची ही भिंत आहे. यामध्ये दोन मुलं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अंश राजकुमार सिंह (11)असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेजवळ काही लहान मुलं खेळत होती. याचवेळी अचानक केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली आहे. यावेळी तेथेच खेळत असलेल्या अंश सिंह याचा मृत्यू झाला तर सोहेब शेख (6) आणि अभिषेक सहानी (10) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. वारंवार शाळेकडे स्थानिकांनी भिंत दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. मात्र, मुजोर शाळेच्या संचालकांनी दुर्लक्ष केल्याने आज मोठी दुर्घटना घडली. शाळेची भिंत कोसळल्याने दोन मुल गंभीर जखमी झाले असून, एकाचा यात मृत्यू झाला आहे.