द्रोणागिरी, उलवे, खारघर नोड गावांचा पाणी पुरवठा एक दिवसासाठी बंद
। बेलापूर । प्रतिनिधी ।
सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेल्या वाहिनीवर महावितरणकडून होणार्या विजेचा पुरवठा त्यांच्या जिते येथील उपकेंद्राच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांमुळे बंद करण्यात येणार असल्याने सिडकोचे हेटवणे जल शुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. यामुळे द्रोणागिरी, उलवे, खारघर नोडसह हेटवणे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार्या गावांचा पाणी पुरवठा शुक्रवार, 25 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून ते शनिवार, 26 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी संबंधित नोड आणि गावांतील नागरिकांनी पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी व सदर कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.