पावसामुळे नागरिकांची तारांबळ

| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात मंगळवार (ता. 21) सकाळी आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शालेय विद्यार्थी, कामगार, वीट व्यावसायिक आदींची तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सर्वांनाच उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत खेडे गावातील भाजी विक्रेते, फळविक्रेते दाखल झाले नव्हते.

तसेच ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती. पावसाने सकाळीच जोरदार बरसात केल्याने कार्यालयात जाणार्‍या नोकरदारांची, परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्याची धावपळ झाली. वीटभट्टी मालकांचीही धांदल उडाली. जवळपास तासभर पावसाचा जोर होता. बदलत्या हवामानामुळे आंबा, काजू पिकाला, भाजीपाला तसेच कडधान्य पिकाला मोठा बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Exit mobile version