| अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीची परीक्षा मंगळवार दि. 11 पासून सुरु झाली आहे. यावेळेस परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांनी ही गर्दी केली होती. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर मुलींच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेच्या महिला कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे.
