महावितरण विभागाकडून स्वच्छता मोहीम

| अलिबाग | प्रतिनिधी |

महावितरण कंपनीच्यावतीने नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत कार्यालयाच्या परिसरासह विद्युत खांब, रोहीत्रच्या ठिकाणी पडलेला कचरा, वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेला महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वच्छता अभियांनाबाबत पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अलिबाग, गोरेगाव, पनवेल ग्रामीण व रोहा विभागांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पेण येथील मंडळ कार्यालयापासून विभागीय, उपविभागीय, शाखा कार्यालयाचा परिसर, स्विचींग केेंद्र, उच्चदाब व लघुदाब विद्युत खांबाजवळील गवत, कचरा, झाडे झुडपे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून काढली. एकूण 455 ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. 77 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Exit mobile version