जे.एस.एम. कॉलेजमध्ये स्वच्छता मोहीम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जे.एस.एम. कॉलेजमधील एनएसएस., एनसी सी. व डीएलएल. इ. च्या विदयार्थ्यांनी आंग्रे समाधी परिसर, अलिबाग समुद्र किनारा व महाविद्यालय परिसर या ठिकाणी स्वच्छता केली.

जेएसएमच्या विद्यार्थ्यांनी आंग्रे समाधी परिसरातील साफसफाई केली त्यानंतर महाविद्यालय परिसर व समुद्र किनारा येथे स्वच्छता केली. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. गायकवाड, डॉ. मीनल पाटील डॉ. सुनील आनंद, डॉ. जयश्री पाटील, एनसीसी कॅप्टन डॉ. मोहसीन खान, प्रा. श्‍वेता पाटील, प्रा. गौरी लोणकर प्रा. सुनील ठोकळे, प्रा. जयेश म्हात्रे व इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अडॅ.पाटील यांनी विदयार्थ्यांनी सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व विशद केले व विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. मिनल पाटील व डॉ. सुनील आनंद तसेच एन. सी. सी. प्रमुख डॉ. मोहसीन खान आणि डी एल.एल.ई प्रमुख प्रा. गौरी लोणकर यांनी प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Exit mobile version