कोंढाणे लेण्यांची स्वच्छता मोहीम

| नेरळ | वार्ताहर |

कोंढाणे लेणीवर पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडियाच्या यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आला. बुद्ध कालीन लेणी हे कर्जत तालुक्याचे आकर्षण असल्याने देशभरातील अभ्यासक या ठिकाणी लेणी पाहण्यासाठी येत असतात.

बुद्ध पौर्णिमा निमित्ताचे औचित्य साधून पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेचे वतीने कर्जतपासून काही अंतरावर असलेल्या बुध्द लेणी कोंढाणे लेणी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुक्याच्या पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली. पर्यटक यांना सहज लेणीपर्यंत जाता यावे या करता संघटनेच्या माध्यमातून दिशा दाखवणारे फलक यांना पांढरा चुणा यांचा त्यावर लावण्यात आला. या वेळी लेणीच्या आतील बाजूचा व बाहेरील परिसर, पायर्‍या स्वच्छ करण्यात आल्या तसेच महापुरुषांची प्रतिमा पाण्याने स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत तब्बल 25 बॅग प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्‍वर साळोखे, किशोर शितोळे, रतन लोंगले, उत्तम ठोंबरे, प्रफुल जाधव, शांताराम मिरकुटे, सोनल जाधव, प्राची जाधव, सोनल भगत, सूरज चव्हाण, तेजस सोनवणे, हर्षद चौधरी, आदी उपस्थित होते.

Exit mobile version